अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट, 2026  1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार

Posted On: 11 SEP 2026 2:53PM by PIB Mumbai

 

बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राला बळकट करण्यासाठी, व्यवसाय सुलभतेला  प्रोत्साहन देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजांनुसार कायदेशीर व नियामक चौकट आधुनिक करण्यासाठी सरकार सातत्याने सुधारणा करत  आहे. बँकिंग पद्धती आणि तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असताना, बँकिंग नोंदींचे नियंत्रण करणारे कायदेही या बदलांशी सुसंगत राहणे गरजेचे आहे.

13 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेला 'बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट, 2026' हा कायदा 'बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट, 1891' ची जागा घेईल. हा कायदा समकालीन बँकिंग पद्धतींशी सुसंगत असलेल्या पुराव्यांच्या स्वरूपात बँकिंग नोंदींच्या वापरासाठी एक आधुनिक चौकट उपलब्ध करतो.

10 सप्टेंबर 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार (राजपत्र अधिसूचनेची लिंक खाली जोडली आहे) 1 ऑक्टोबर 2026 ही या कायद्यातील तरतुदी लागू होण्याची तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे.

हा कायदा भौतिक , इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, व्हर्च्युअल, क्लाउड-आधारित आणि इतर समकालीन स्वरूपात ठेवलेल्या बँकिंग नोंदींना मान्यता देऊन तंत्रज्ञान-तटस्थ  दृष्टिकोनाचा अंगिकार करतो. यात मॅन्युअल, डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक स्वाक्षऱ्यांद्वारे बँकिंग नोंदींच्या सोप्या आणि मानकीकृत प्रमाणीकरणाची सोय देखील आहे.

ज्या खटल्यांमध्ये बँक स्वतः पक्षकार  नाही, तेथे बँकेच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्याबाबत अधिक स्पष्टता देण्यात आली आहे, ज्यासाठी न्यायालयाला असे समन्स बजावण्याचे "विशेष कारण"  लिखित स्वरूपात नोंदवणे आवश्यक असेल.

याशिवाय, केंद्र सरकार या तरतुदी विशिष्ट आर्थिक क्षेत्रातील संस्था किंवा संस्थांच्या वर्गांपर्यंत वाढवू शकते, ज्यामुळे बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार ही चौकट उपयुक्त ठरेल.

या सुधारणा तंत्रज्ञानातील प्रगती आणि बदलत्या आर्थिक गरजांनुसार कायदे आधुनिक करण्यासाठी, व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक आधुनिक व कार्यक्षम आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारची निरंतर वचनबद्धता दर्शवत आहेत.

10 सप्टेंबर 2026 च्या राजपत्र अधिसूचनेची लिंक: 

https://egazette.gov.in/(S(0v51umtjulhvflhxyeripblv))/ViewPDF.aspx 

https://egazette.gov.in/(S(blcfbghvrddn1sxjnyv5hrpw))/ViewPDF.aspx

***

निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309198) अभ्यागत कक्ष : 12