राष्ट्रपती कार्यालय
प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची घेतली भेट
Posted On:
10 SEP 2026 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026
प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांनी आज (10 सप्टेंबर 2026) राष्ट्रपती भवन इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेतली.
आगा खान म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर भारताच्या त्यांच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यानिमित्त राष्ट्रपतींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांचे वडील, दिवंगत आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. भारतात आगा खान चौथे आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क यांच्या कार्याबद्दल अत्यंत आदर आणि आपुलकीची भावना असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कतर्फे भारतात पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, माता आरोग्य, शहरी पुनर्विकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती अशा विविध क्षेत्रांत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे राष्ट्रपतींनी यावेळी कौतुक केले. हे प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीची उत्कृष्ट उदाहरणे असून, सरकारसोबत भागीदारीत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमुळे लोकांचे जीवनमान कशा प्रकारे सुधारू शकते, हे या प्रकल्पांतून दिसून येते, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.


निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308975)
अभ्यागत कक्ष : 12