इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये यूआयडीएआय कडून 'आधार फेस ऑथेंटिकेशन एसडीके' आणि 'सँडबॉक्स' चे अनावरण
Posted On:
09 SEP 2026 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने बुधवारी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये 'आधार फेस ऑथेंटिकेशन एसडीके' (सॉफ्टवेअर विकास संच) आणि 'आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स' लाँच केले. यामुळे परिसंस्थेतल्या भागीदारांना त्यांच्या डिजिटल ॲप्लिकेशन्समध्ये आधार फेस ऑथेंटिकेशन अधिक सुलभतेने एकत्रित करणे, चाचणी घेणे आणि त्याचा वापर करणे शक्य होणार आहे.

या आधार फेस ऑथेंटिकेशनमुळे एसडीके यूआयडीएआयची चेहरा पडताळणी क्षमता थेट मूळ अँड्रॉइड आणि आयओएस ॲप्लिकेशन्समध्ये येणार आहे. यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळी ॲप्लिकेशन्स वापरण्याची आवश्यकता उरणार नाही आणि एकाच ॲपद्वारे अधिक सुलभ पडताळणीचा अनुभव मिळेल.
हे वापरण्यासाठी तयार असलेले एसडीके कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग वर आधारित लाइव्हनेस आणि ‘अँटी-स्पूफिंग’ क्षमतांचा समावेश करून परिसंस्थेतल्या भागीदारांसाठी एकत्रीकरण सुलभ करते. ही पडताळणी डेटाची सुरक्षित हाताळणी आणि एन्क्रिप्शनलाही पाठबळ देते. ही सुविधा सर्वसामान्य ग्राहकांच्या स्मार्टफोनवर कार्य करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हे एसडीके सरकारी विभाग, बँका, फिनटेक आणि इतर संस्थांना चेहरा पडताळणी-सक्षम सेवा अधिक कार्यक्षमतेने तैनात करायला मदत करेल, अशी अपेक्षा आहे.
एसडीके सोबतच, यूआयडीएआयने 'आधार फेस ऑथेंटिकेशन सँडबॉक्स' चेही अनावरण केले. हा सँडबॉक्स म्हणजे एक सुरक्षित आणि नियंत्रित वातावरण आहे. हे वातावरण संस्थांना प्रत्यक्ष ऑनबोर्डिंगपूर्वी संपूर्ण चेहरा पडताळणी प्रक्रियेचे एकत्रीकरण, चाचणी आणि वैधता तपासण्याची मुभा देते.
या सँडबॉक्समुळे विकासक आणि गुणवत्ता आश्वासन चमूंना कोणत्याही बाह्य बायोमेट्रिक हार्डवेअरची आवश्यकता न भासता वापरकर्ता नोंदणी आणि संमती, चेहरा कॅप्चर करणे, लाइव्हनेस तपासणे, पडताळणी, त्रुटी हातळणे आणि प्रतिसाद वैधता यांसारख्या प्रमुख टप्प्यांची चाचणी घेता येते. यामुळे अमान्य डिजिटल स्वाक्षऱ्या, नेटवर्कमधले अडथळे, टाईमआऊट आणि स्पूफिंगचे प्रयत्न यांसारख्या अयशस्वी परिस्थितींचीही चाचणी घेता येते.
एसडीके आणि सँडबॉक्सच्या अनावरणामुळे वापरकर्त्याच्या बँक किंवा फिनटेक संस्थेच्या मोबाईल ॲपमधूनच एक सुलभ आणि सुरक्षित ऑनबोर्डिंग प्रक्रिया तयार करण्याच्या फिनटेक आणि बँकिंग क्षेत्राच्या प्रदीर्घ प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.
यामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे. वापरकर्ता फक्त एकच ॲप डाऊनलोड करेल उदाहरणार्थ बँकिंग, विमा किंवा ब्रोकिंग ॲप, आणि त्या ॲपमधूनच आधार पडताळणी करेल. पूर्वी, अशाच अनुभवासाठी 'फेसआरडी' (FaceRD) नावाच्या एका बॅकग्राउंड ॲपची आवश्यकता होती. यामुळे वापरकर्त्याचा ऑनबोर्डिंग प्रवास मोठा व्हायचा आणि तो 'आधार फेसआरडी' ॲपवर अवलंबून राहायचा. या अनावरणामुळे आधार चेहरा पडताळणीसाठी असलेली अनेक ॲप्सची गरज आता कमी झाली आहे.
सुवर्णा बेडेकर/ निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308537)
अभ्यागत कक्ष : 6