अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट-इंडिया' (FIU-IND) ने 'आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002' च्या कलम 13 अन्वये नियमांचे पालन न केल्याबद्दल 15 'व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स'ना (VDA SPs) नोटिसा बजावल्या

Posted On: 09 SEP 2026 3:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांविरुद्धच्या कारवाईचा एक भाग म्हणून, 'फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट-इंडिया' (FIU-IND) च्या संचालकांनी 'आर्थिक गैरव्यवहार  प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002' च्या कलम 13 अन्वये नियमांचे पालन न केल्याबद्दल  खालील 15 'व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स'ना (VDA SPs) नोटिसा बजावल्या आहेत:-

S. No

Trade Name

Entity Name

1

Weex

Weex International Exchange LTD

2

Blofin

BLF Global Limited

3

Rezorex

RezorEx

4

Bitunix

Bitunix LLC

5

DigiFinex

DigiFinex Ltd

6

Toobit

Hopeful Technology Co. Ltd.

7

XT.com

Fibtc Ltd/ XT TECHNICAL PTE. LTD.

8

Latoken

LAtrade Ltd

9

WOO X

Wootech Limited

10

Pionex

Marketa Trading Inc.

11

ChangeNow

CHN Group LLC

12

SimpleSwap

SimpleSwap LTD

13

Fixedfloat

FFGX Group LLC

14

WhiteBIT

UAB Clear White Technologies

15

Guardarian

FinSeven CZ

तसेच , FIU-IND च्या संचालकांनी , जे 'माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम  79(3)(b)  आणि 'माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) सुधारणा नियम, 2025,' च्या नियम 3(1)(d) अन्वये 'नोडल अधिकारी' म्हणून काम पाहतात , त्यांनी या संस्थांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा, ती ॲप्लिकेशन्स/URLs सार्वजनिक वापरासाठी हटवण्यासाठी आहेत, जी भारतात आर्थिक व्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींचे पालन न करता बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत.

मार्च 2023 मध्ये, 'आर्थिक व्यवहार प्रतिबंधक कायदा, 2002 च्या तरतुदींनुसार 'व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्स' ना 'आर्थिक व्यवहार प्रतिबंधक/दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणे' (AML/CFT) या चौकटीच्या  कक्षेत आणण्यात आले होते .

भारतात कार्यरत असलेले VDA SP (मग ते  देशांतर्गत असोत किंवा परदेशातील) जे 'व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स' व 'फियाट करन्सी' यांच्यातील देवाणघेवाण, वर्चुअल डिजिटल एसेट्सचे हस्तांतरण, ते सुरक्षित ठेवणे किंवा त्याचे व्यवस्थापन, तसेच वर्चुअल डिजिटल एसेट्सवर नियंत्रण ठेवणारी साधने यांसारख्या कामांमध्ये सहभागी आहेत,त्यांना 'FIU-IND' कडे 'रिपोर्टिंग एंटिटी' म्हणून नोंदणी करावी लागेल. तसेच, त्यांना 'मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002' (PMLA) आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांनुसार विहित जबाबदाऱ्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या जबाबदाऱ्या संबंधित क्रियाकलापांवर आधारित आहेत आणि त्यासाठी  संबंधित संस्था भारतात प्रत्यक्ष अस्तित्वात असणे गरजेचे नाही.  या नियमांमुळे VDA सेवा पुरवठादारांवर माहिती सादर करणे, नोंदी ठेवणे आणि इतर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये FIU-IND कडे नोंदणी करणे समाविष्ट आहे.  

सामान्य जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि माहितीसाठी हे नमूद करणे आवश्यक आहे की, 'क्रिप्टो उत्पादने' आणि 'NFTs' हे कोणत्याही नियामक नियंत्रणाखाली नाहीत आणि यात खूप मोठी जोखीम असू शकते.  अशा व्यवहारांमुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी कोणताही नियामक उपाय किंवा मदत मिळू शकत नाही.

नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308263) अभ्यागत कक्ष : 6