पंतप्रधान कार्यालय
पोषणविषयक उपक्रम आणि अंगणवाडी व्यवस्था बळकट करण्याबाबतचा लेख पंतप्रधानांनी सामायिक केला
Posted On:
08 SEP 2026 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2026
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
हा लेख, 'मातृ वंदना योजना' आणि 'पोषण महिना’'च्या गेल्या 10 वर्षांच्या वाटचालीवर आधारित असून, अंगणवाडी यंत्रणेला लोकचळवळ बनवण्याच्या संदेशावर प्रकाश टाकतो. थेट लाभ हस्तांतरण (DBT), सामाजिक लेखापरीक्षण आणि पौष्टिक आहार हे घटक कशा प्रकारे बालके, महिला आणि किशोरवयीन मुलींना आधार देत आहेत, हे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे. "हमारी अंगणवाडी, हमारी जिम्मेदारी" (आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी) या विचारसारणीपासून प्रेरित झालेले हे प्रयत्न कुपोषणमुक्त आणि 'विकसित भारता'च्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करत आहेत, असे हा लेख नमूद करतो.
आपल्या एक्स (X) या समाजमध्यमांवरील संदेशात पंतप्रधान म्हणतात :
मातृ वंदना योजना आणि पोषण महिन्याच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त, केंद्रीय मंत्री श्रीमती @Annapurna4BJP यांचा हा लेख अंगणवाडी व्यवस्थेला एक जनआंदोलन बनवण्याचा संदेश देतो. थेट लाभ हस्तांतरण (DBT), सामाजिक लेखापरीक्षण आणि पौष्टिक आहार हे, बालके, महिला आणि किशोरवयीन मुलींना कसे सक्षम बनवत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले आहे. 'आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी' या दूरदृष्टीसह केलेला हा प्रयत्न, कुपोषणमुक्त आणि विकसित भारताचा मार्ग अधिक प्रशस्त करत आहे.”
नेहा कुलकर्णी/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308090)
अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam