अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वित्त मंत्र्यांची सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत भेट


कर्मचाऱ्यांनी मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकाऱ्यांसाठीची ‘कामगिरीशी निगडित प्रोत्साहन’ (पीएलआय) योजना ठेवण्यात आली स्थगित

Posted On: 07 SEP 2026 9:05PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वित्त मंत्र्यांनी आज भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षेत्रातील विविध बँकांचे  प्रतिनिधित्व करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. प्रतिनिधी मंडळाने बँकिंग क्षेत्राशी संबंधित विविध मुद्दे केंद्रीय वित्तमंत्र्यांसमोर मांडले. यामध्ये सानुग्रह अनुदानाचा (Ex-gratia) आढावा घेणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सध्याच्या ‘कामगिरीशी निगडित प्रोत्साहन’ (पीएलआय) योजनेच्या रचनेचा पुनर्विचार करणे तसेच कर्मचाऱ्यांशी संबंधित इतर समस्यांचा समावेश होता.

बँक कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेण्यात आली आहे. पीएलआय योजनेच्या संरचनेबाबत प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने, आर्थिक वर्ष 2025–26 साठी 19 नोव्हेंबर 2024 रोजी अधिसूचित केलेल्या पीएलआय योजनेची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय करार / संयुक्त टिप्पणी चर्चेदरम्यान या विषयावर विचार करण्यात येणार आहे.

बँक कर्मचारी, ग्राहक आणि बँकिंग क्षेत्राच्या व्यापक हितासाठी संवाद, सल्लामसलत आणि परस्पर सामंजस्याच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी, सरकार कटिबद्ध आहे.

***

माधुरी पांगे/आशुतोष सावे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2307694) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English