उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 6 ते 9 सप्टेंबरदरम्यान आसाम, मेघालय, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर
Posted On:
05 SEP 2026 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2026
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 6 ते 9 सप्टेंबर 2026 दरम्यान आसाम, मेघालय, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशचा चार दिवसांचा दौरा करणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान उपराष्ट्रपती विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याबरोबरच ऐतिहासिक, सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्थांना भेटी देणार आहेत.
6 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचतील. ते गीतानगर महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहतील. यापूर्वी कन्या महाविद्यालय म्हणून ते ओळखले जात होते.त्यानंतर ते गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.
7 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती गुवाहाटी विद्यापीठात पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर विद्यापीठाच्या अधिवेशन केंद्रात विद्यार्थी, शिक्षक आणि प्रमुख नागरिकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते मेघालयातील शिलाँग येथे रवाना होतील. तेथे सोसो थाम सभागृहात आयोजित सार्वजनिक स्वागत समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
8 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती मणिपूरमधील इंफाळला भेट देतील. ते मोइरांग येथील आयएनए म्हणजेच आझाद हिंद सेना संग्रहालय आणि युद्ध स्मारक तसेच सैनिक स्कूल इंफाळला भेट देतील. त्यानंतर ते अरुणाचल प्रदेशातील इटानगरकडे रवाना होतील.
9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि विधानसभा दालन-सह-संग्रहालयाला भेट देतील. तसेच ते इटानगरमधील न्येदार नामलो, जवाहरलाल नेहरू राज्य संग्रहालय आणि श्रवण व दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डोनी पोलो मिशन विद्यालयाला भेट देतील.
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307030)
अभ्यागत कक्ष : 13