पंतप्रधान कार्यालय
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक
पंतप्रधानांनी डॉ. एस. राधाकृष्णन यांना आदरांजली वाहिली
Posted On:
05 SEP 2026 1:30AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2026
शिक्षक दिन हा समाजासाठी शिक्षकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे. या दिवशी डॉ. एस. राधाकृष्णन यांना आदरांजली वाहिली जाते, असे त्यांनी सांगितले.
तसेच, काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना 7, लोककल्याण मार्ग येथे आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी झालेल्या संवादाची काही छायाचित्रे आणि माहिती पंतप्रधानांनी सामायिक केली.
पंतप्रधानांनी एक्सवरील संदेशात म्हटले की,
शिक्षक दिन हा समाजासाठी शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक करण्याचा दिवस आहे. तसेच, डॉ. एस. राधाकृष्णन यांना आदरांजली वाहण्याचाही हा दिवस आहे. काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना 7, लोककल्याण मार्ग येथे आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या संवादाची काही क्षणचित्रे येथे देत आहे.
* * *
शैलेश पाटील/राज दळेकर//दर्शना राणे
(Release ID: 2306913)
अभ्यागत कक्ष : 7