गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'श्रीकृष्ण जन्माष्टमी'च्या मंगल पर्वानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या देशातील जनतेला हार्दिक शुभेच्छा


'श्रीकृष्ण जन्माष्टमी'निमित्त केंद्रीय गृहमंत्र्यांनी नवी दिल्लीतील बिर्ला मंदिरात भगवान श्रीकृष्णाची पूजा करून सर्व नागरिकांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी केली प्रार्थना

संपूर्ण देशभर श्रद्धा, भक्तीभावना आणि प्रचंड उत्साहात साजरा होत आहे 'श्रीकृष्ण जन्माष्टमी'चा मंगलमय सोहळा

न्यायप्रियता, नीतिमत्ता आणि लोककल्याण यांचे मूर्तिमंत रूप असलेल्या योगेश्वर भगवान श्रीकृष्णांचा सर्वांवर कृपाशीर्वाद राहो

Posted On: 04 SEP 2026 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी आज 'श्रीकृष्ण जन्माष्टमी'च्या मंगल पर्वानिमित्त देशातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यानिमित्त, गृहमंत्र्यांनी नवी दिल्ली येथील बिर्ला मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाची पूजा-अर्चना करून सर्व नागरिकांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'एक्स' समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये "श्रीकृष्ण जन्माष्टमी'च्या पवित्र सोहळ्यानिमित्त सर्व देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा. न्यायप्रियता, नीतिमत्ता आणि लोककल्याण या मूल्यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या योगेश्वर भगवान श्रीकृष्णांचा सर्वांवर सदैव कृपा-आशीर्वाद राहो. जय श्रीकृष्ण." असे म्हटले आहे.

'एक्स' वरील आणखी एका पोस्टमध्ये गृहमंत्री म्हणतात, "जय श्री कृष्ण! संपूर्ण देशभर 'श्री कृष्ण जन्माष्टमी'चा पवित्र सण श्रद्धा, भक्ती आणि प्रचंड उत्साहाने साजरा होत आहे. आज या शुभ प्रसंगी, मी नवी दिल्लीतील बिर्ला मंदिरात भगवान श्री कृष्णाची पूजा करून सर्व देशवासियांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली."

003.jpg.jpeg   HWP_0305.JPG.jpeg

CR3_0105.JPG.jpeg

 

 

* * *

माधुरी पांगे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306860) अभ्यागत कक्ष : 10