राष्ट्रपती कार्यालय
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
04 SEP 2026 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे: “शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व शिक्षकांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देते. माजी राष्ट्रपती आणि महान लेखक, तत्त्वज्ञ तसेच असामान्य शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. या प्रसंगी मी त्यांना विनम्र अभिवादन करते.
शिक्षक आपले मार्गदर्शन आणि सहयोगाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला आकार देण्यात आणि त्यांचे चारित्र्य घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांना चांगले माणूस बनण्यासाठी मार्गदर्शन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. समर्पित आणि संवेदनशील शिक्षक विद्यार्थ्यांमधील अद्वितीय क्षमता ओळखू शकतो, त्यांच्यासाठी प्रेरणास्रोत ठरू शकतो आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो.
शिक्षकांनी सातत्याने आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासोबतच जिज्ञासा आणि चौकस वृत्ती वाढीस लावावी.
देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व समर्पित शिक्षकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. देशाला नव्या शिखरावर घेऊन जातील अशा प्रबुद्ध पिढ्या शिक्षकांनी घडवाव्यात, अशी माझी कामना आहे.”
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306802)
अभ्यागत कक्ष : 5