पंतप्रधान कार्यालय
महानायक उत्तम कुमार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
03 SEP 2026 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2026
महान अभिनेते महानायक उत्तम कुमार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. ज्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका पिढ्यानपिढ्यांना आजही प्रभावित करत आहेत, असे ते एक दिग्गज अभिनेते होते अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांचा गौरव केला. त्यांनी नुकत्याच झालेल्या 'मन की बात' प्रसारणादरम्यान या दिग्गज अभिनेत्याबद्दल केलेले वक्तव्यही सामायिक केले.
पंतप्रधानांनी एका एक्स पोस्टमध्ये सामायिक केलेः
"महानायक उत्तम कुमार ... एक दिग्गज अभिनेते, ज्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका पिढ्यानपिढ्यांना आजही प्रभावित करत आहेत.
त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन.
गेल्या रविवारी #MannKiBaat कार्यक्रमात मी त्यांच्याबद्दल जे बोललो होतो ते देखील सामायिक करत आहे.
মহানায়ক উত্তম কুমার... এক কিংবদন্তি যাঁর কালজয়ী পরিবেশনা প্রজন্মান্তরের মানুষের সঙ্গে সংযোগ স্থাপন করে চলেছে।
তাঁর জন্মশতবার্ষিকীতে শ্রদ্ধাঞ্জলি।
গত রবিবার #MannKiBaat অনুষ্ঠানে আমি তাঁর সম্পর্কে যা বলেছিলাম, তাও শেয়ার করছি।"
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306402)
अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam