सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे अंदाज जाहीर झाल्यानंतर प्राप्त झालेली जीडीपी अंदाजासंबंधित अतिरिक्त माहिती

Posted On: 02 SEP 2026 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2026

 

मंत्रालयाने 2022-23 हे आधार वर्ष मानून 31 ऑगस्ट 2026 रोजी वार्षिक आणि तिमाही जीडीपी अंदाजांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. हे जीडीपी अंदाज 2022-23 हे आधार वर्ष मानून 'आउटपुट प्रोड्युसर प्राईस इंडेक्स' (PPI) आणि 'बँकिंग सर्व्हिसेस प्राईस इंडेक्स' (BkSPI) यांच्या नवीन मालिकेचा तसेच विविध प्रशासकीय स्रोतांकडून मिळालेल्या ताज्या माहितीचा वापर करून अद्ययावत करण्यात आले आहेत.

आता जी अतिरिक्त माहिती प्रसिद्ध केली जात आहे, ती प्रामुख्याने 'डबल डिफ्लेशन' पद्धतीचा अवलंब आणि त्यामुळे निर्माण होणारे नकारात्मक 'इम्प्लिसिट डिफ्लेटर्स'; सीपीआय (CPI) आणि डब्ल्यूपीआय (WPI) यांसारख्या इतर डिफ्लेशन निर्देशांकांशी केलेली त्याची तुलना; नाममात्र आणि वास्तविक GVA/GDP मधील तफावत; उत्पादन/उत्पन्न आणि खर्च यानुसार काढलेल्या जीडीपी अंदाजांमधील विसंगती; तसेच नवीन आणि जुन्या मालिकेतील विकास दरांची तुलना इत्यादी बाबींशी संबंधित आहे. अधिक स्पष्टता आणण्यासाठी, मंत्रालयाने विविध संबंधितांच्या वापरासाठी परिशिष्टानुसार हे अतिरिक्त प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत.

परिशिष्ट

अशा प्रकारे, वास्तविक आणि नाममात्र GVA वाढीमधील लक्षणीय तफावत ही वास्तविक आणि नाममात्र अंदाजांमधील विसंगतीचा परिणाम नाही तर प्रामुख्याने खनिजांच्या विशेषतः कच्चे खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि धातू खनिजे यांच्या किमतींत झालेल्या मोठ्या वाढीचा परिणाम आहे. त्यानुसार,2026-27 च्या पहिल्या तिमाहीत खाणकाम आणि उत्खनन क्षेत्रातील नाममात्र GVA वाढ 22.3% इतकी होती.

2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे अंदाज सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहेत आणि अधिक सर्वसमावेशक व अद्ययावत मूळ माहिती उपलब्ध होताच या अंदाजांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते. अतिरिक्त माहिती समाविष्ट केल्यावर  विविध पद्धतींनुसार तयार केलेल्या अंदाजांमध्ये बदल होऊ शकतात आणि परिणामी, सांख्यिकीय तफावतीमध्येही बदल होऊ शकतो.

त्यामुळे, सध्याची तफावत पुढील सुधारणांच्या फेऱ्यांमध्ये बदलली तर जीडीपीमध्ये निश्चितपणे वाढ होईल किंवा ती वाढ विशिष्ट प्रमाणातच असेल, असा निष्कर्ष आधीच काढता येणार नाही. कोणत्याही सुधारणेची दिशा आणि प्रमाण हे केवळ तफावतीच्या यांत्रिक समायोजनावर अवलंबून न राहता, उत्पादन आणि खर्चाशी संबंधित मूळ आकडेवारीमध्ये केल्या जाणाऱ्या सुधारणांवर अवलंबून असेल.

विद्यमान  किमतींनुसार अंतिम आकडेवारी जाहीर केली जाईल तेव्हा ही तफावत अत्यंत नगण्य किंवा शून्य असेल; जसे आर्थिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 च्या बाबतीत दिसून आले होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306103) अभ्यागत कक्ष : 14