वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी परकीय व्यापार महासंचालनालयाकडून (डीजीएफटी) 'फ्री सेल आणि कॉमर्स प्रमाणपत्रांची स्वयंचलित वितरण सुविधा
Posted On:
01 SEP 2026 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2026
निर्यातदार समुदायांकरिता 'व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी सरकारने वेळोवेळी घेतलेल्या उपक्रमांना पुढे नेत, परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) आपल्या पोर्टलवर 'फ्री सेल आणि कॉमर्स (एफएससी) प्रमाणपत्रे' स्वयंचलित पद्धतीने जारी करण्याची सुविधा सुरू केली आहे. ही प्रमाणपत्रे परकीय व्यापार धोरणाअंतर्गत अशा उत्पादनांसाठी निर्यातदारांना दिली जातात, ज्यांचा समावेश औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 अंतर्गत होत नाही. सध्या अशी प्रमाणपत्रे DGFT च्या प्रादेशिक प्राधिकरणांकडून तपासणी आणि पडताळणीनंतर दिली जातात.
पात्र अर्जांचा आता सध्याच्या चौकटीनुसार स्वयंचलित वितरणासाठी विचार केला जाईल, ज्यामुळे ते प्रत्यक्ष मानवी हस्तक्षेपाद्वारे तपासणीसाठी पाठवले जाणार नाहीत. या स्वयंचलित व्यवस्थेमुळे एफएससी अर्जांच्या मोठ्या प्रवर्गासाठी लागणारा प्रक्रियेचा वेळ कमी होईल आणि आधीच्या हस्तचलित प्रक्रियेशी संबंधित अनुपालन भार कमी होईल अशी अपेक्षा आहे.
ज्या अर्जांसाठी पडताळणी आवश्यक आहे किंवा जे अर्ज स्वयंचलित प्रक्रियेच्या निकषांची पूर्तता करत नाहीत, ते हस्तचलित प्रक्रियेसाठी संबंधित प्रादेशिक प्राधिकरणाकडे पाठवले जाणे सुरूच राहील.
प्रणालीच्या जोखीम व्यवस्थापन निकषांनुसार पुनरावलोकनासाठी, स्वयंचलितपणे मंजूर झालेले काही विशिष्ट अर्ज नंतर संबंधित प्रादेशिक प्राधिकरणाकडे पाठवले जाऊ शकतात.
या उपायामुळे अनावश्यक मानवी हस्तक्षेप कमी होईल, प्रक्रियेची सुलभता सुधारेल आणि पात्र निर्यातदारांना एफएससी प्रमाणपत्रांचे जलद वितरण सुलभ होईल; तसेच ज्या अर्जांना तपासणीची गरज आहे त्यांच्यासाठी योग्य पडताळणी आणि देखरेख कायम राहील. स्वयंचलित, नियम-आधारित प्रक्रिया मजबूत करून आणि जोखीम-आधारित पुनरावलोकन लागू करून, हा उपक्रम 'फ्री सेल आणि कॉमर्स प्रमाणपत्रांचे वितरण निर्यातदार आणि प्रशासकीय प्राधिकरणांसाठी अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि भाकित करण्याजोगे करेल अशी अपेक्षा आहे.
पूर्ण नोटिससाठी येथे क्लिक करा
* * *
आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305492)
अभ्यागत कक्ष : 7