पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केले, खऱ्या अर्थाने बुद्धिमान व्यक्तीच्या गुणांना अधोरेखित करणारे सुभाषित
Posted On:
01 SEP 2026 11:03AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खऱ्या अर्थाने बुद्धिमान व्यक्तीच्या गुणांना अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले;
"यस्य कृत्यं न जानन्ति मन्त्रं वा मन्त्रितं परे।
कृतमेवास्य जानन्ति स वै पण्डित उच्यते॥"
खऱ्या अर्थाने बुद्धिमान व्यक्ती तीच असते जिची योजना आणि कृती पूर्ण होईपर्यंत इतरांना कळत नाहीत. अशा शिस्तबद्ध, विवेकी आणि विचारशील व्यक्तीलाच खऱ्या अर्थाने बुद्धिमान मानले जाते.
* * *
आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305317)
अभ्यागत कक्ष : 7