गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये, आपल्या लोकसभा मतदारसंघातील टाईप-1 मधुमेहाने पीडित मुलींबरोबर रक्षाबंधनाचा  सण साजरा केला


मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार अशा मुलांना आजीवन मोफत इन्सुलिन पुरवत आहे

Posted On: 28 AUG 2026 4:53PM by PIB Mumbai

  

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये, आपल्या लोकसभा मतदारसंघातील टाईप-1 मधुमेहाने पीडित मुलींबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'X' वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज अहमदाबादमध्ये मी माझ्या संसदीय मतदारसंघातील टाईप-1 मधुमेहाने पीडित मुलींबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. टाईप-1 मधुमेहाने ग्रस्त मुलांना आयुष्यभर इन्सुलिनची इंजेक्शन्स घ्यावी लागतात, यामुळे त्यांच्या कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडतो. मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आमचे सरकार अशा सर्व मुलांना आजीवन मोफत इन्सुलिन पुरवत आहे. हा दूरदर्शी उपक्रम, जो अनेक विकसित राष्ट्रे सध्या राबवण्याचा प्रयत्न करत आहेत, तो मोदी सरकारच्या 'सेवा, करुणा आणि सुरक्षा' या तत्त्वांप्रति वचनबद्धतेचा दाखला आहे.

यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सर्व मुलींना रक्षाबंधनाच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बोलताना अमित शाह म्हणाले, "मोदी सरकारसाठी जनसेवा ही केवळ एक जबाबदारी नसून, ती संवेदनशील प्रशासनाचे मार्गदर्शक तत्त्व आहे." जेव्हा मुलींचे आरोग्य सुरक्षित असेल, तेव्हाच कुटुंब आणि समाजाचे भविष्य सुरक्षित असेल. रक्षाबंधनाच्या मंगल प्रसंगी मुलींना मोफत इन्सुलिन देण्याचा हा उपक्रम मुलींचे संरक्षण आणि आरोग्याप्रति असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

***

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304408) अभ्यागत कक्ष : 13