पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नॉर्वेचे राजे महामहीम हॅराल्ड पंचम  यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 28 AUG 2026 4:33PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे राजे महामहीम हॅराल्ड पंचम  यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या वर्षाच्या सुरुवातीला नॉर्वेच्या दौऱ्यादरम्यान महामहीम राजांसमवेत  झालेल्या भेटीचा आठवण काढत,  मोदी यांनी त्यांच्यातील स्नेहभाव आणि नॉर्वेचे लोक आणि  राष्ट्र यांच्याप्रती असलेली त्यांची निस्सीम सेवावृत्ती यांचे स्मरण केले.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

नॉर्वेचे राजे महामहीम हॅराल्ड पंचम  यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला नॉर्वेच्या दौऱ्यादरम्यान महामहीम राजांची झालेली भेट मला आवर्जून आठवते; त्यांचा स्नेहभाव आणि राष्ट्राप्रती असलेली त्यांची निस्सीम सेवावृत्ती माझ्या मनाला खोलवर स्पर्शून गेली होती.

राजघराणे आणि नॉर्वेच्या जनतेप्रती मी संवेदना व्यक्त करतो.

***

निलिमा चितळे/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304384) अभ्यागत कक्ष : 14