पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी 'खेलो इंडिया संवाद' कार्यक्रमातील ठळक क्षण केले सामायिक

Posted On: 27 AUG 2026 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'खेलो इंडिया संवाद' या कार्यक्रमातील ठळक क्षण समाज माध्यमावर सामायिक केले. अशा भव्य आणि उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी आयोजक, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि 'माय भारत'च्या लाखो स्वयंसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

येत्या 29 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा दिना'चे औचित्य साधून त्यांनी देशभरातील युवक आणि संपूर्ण क्रीडा जगताला आधीच शुभेच्छा दिल्या. "हा दिवस भारतमातेचे महान सुपुत्र मेजर ध्यानचंद जी यांचे स्मरण करण्याचाही आहे," असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी 'X'  वर लिहिले:

"भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाबाबतची काही माहिती  तुम्हा सर्वांना आश्चर्यचकित करेल.

म्हणूनच, आता उत्कृष्टतेवर  लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे आणि सध्या आम्ही तेच करत आहोत...

 

क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत लोकांच्या दृष्टिकोनात होत असलेला बदल तुम्ही पाहत आहात ना?"

 

* * *

निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304020) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English , Gujarati