राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 27 AUG 2026 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2026

 

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या : -

“रक्षाबंधनच्या निमित्ताने भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.

रक्षाबंधन हा सण प्राचीन काळापासून आपल्या संस्कृती आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. श्रद्धेने मनगटावर बांधला जाणारा राखीचा धागा ‘रक्षाबंधन’ म्हणून ओळखला जाणारा संरक्षणाचा एक पवित्र बंध मानला जातो. अनेक श्लोक आणि मंत्रांमध्ये आपल्याला “रक्षे, मा चला, मा चला” हे शब्द आढळतात. या शब्दातून “संरक्षणाचा हा बंध सदैव टिकून राहो”, अशी प्रार्थना व्यक्त होते.

रक्षाबंधन हा एक सामाजिक सण म्हणूनही लोकप्रिय झाला आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या आणि सोबतच इतर भावंडांच्या मनगटावर राखी बांधतात. हा सण केवळ भाऊ-बहिणींमध्येच नव्हे, तर सर्व भावंडे, कुटुंबीय, मित्र आणि समाजातील व्यक्ती यांच्यातील स्नेह, आदर आणि परस्पर जबाबदारीच्या भावनांचे प्रतीक आहे. हा सण आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक नाते विश्वास, संवेदनशीलता, परस्पर सहकार्य आणि आपुलकीच्या स्तंभांवर आधारलेले असते. 

या पावन प्रसंगी, आपण आपल्या कुटुंबांमधील आणि समाजांमधील बंध अधिक दृढ करण्याचा संकल्प करुया. याच भावनेने आपण ‘विकसित भारता’च्या दिशेने आपण वाटचाल करूया.”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303996) अभ्यागत कक्ष : 10