राष्ट्रपती कार्यालय
ओणमच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
25 AUG 2026 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओणमच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे:-
“ओणमच्या पावन प्रसंगी मी सर्व देशवासीयांना, विशेषतः भारतात आणि परदेशात राहणाऱ्या केरळमधील माझ्या बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते आणि मंगलकामना व्यक्त करते.
हा सण सुगीच्या आगमनाबद्दल निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रसंग आहे. ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि बंधुभावाच्या भावनेचा उत्सव साजरा करतो. हा सण विविधतेत एकतेची भावना दृढ करतो. नौकानयन शर्यती, लोकनृत्य, संगीत आणि खेळ अशा या सणाशी संबंधित महत्त्वाच्या परंपरा आहेत. त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचे दर्शन घडते.
हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, तसेच राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी नागरिकांना प्रेरित करो, अशी ही प्रार्थना करते.”
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303342)
अभ्यागत कक्ष : 15