पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नागरिकांना यूपीआयच्या दशकपूर्तीनिमित्त यूपीआयबाबतचे आपले अनुभव सामायिक करण्याचे केले आवाहन

Posted On: 25 AUG 2026 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2026

 

देशाच्या डिजिटल पेमेंट्स प्रवासात मैलाचा टप्पा ठरलेल्या, दशकभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) परिवर्तनकारी प्रवासाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.

यूपीआयने गेल्या दहा वर्षात गाठलेली व्याप्ती आणि विस्तार पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहेत. हा उल्लेखनीय प्रवास प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. यूपीआयच्या वापराबाबतचे अनुभव आणि त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम याबाबतचे आपले अनुभव सामायिक करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे;

दशकभरापूर्वी यूपीआय सुरू करण्यात आले, देशाच्या डिजिटल पेमेंट्स प्रवासात हे एक ऐतिहासिक वळण ठरले.

यूपीआयची प्रचंड व्याप्ती आणि विस्तार, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.

यूपीआयबाबत तुमचा अनुभव आणि याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे, ते मला सांगा...

#10YearsOfUP

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303147) अभ्यागत कक्ष : 17