दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डाक मित्र' आणि 'डाक सेवा' या अद्ययावत केलेल्या ॲप्सद्वारे भारतीय टपाल विभागाकडून डिजिटल आणि पायाभूत सुविधांच्या परिवर्तनाला गती

प्रविष्टि तिथि: 24 AUG 2026 8:38PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली: 24 ऑगस्ट 2026

टपाल विभागाने 'डाक मित्र' आणि 'डाक सेवा' ही अद्ययावत मोबाइल ॲप्लिकेशन्स सुरू कण्यासोबतच देशभरातील 14 नूतनीकृत केलेल्या टपाल कार्यालय इमारतींचे उद्घाटन करून टपाल सेवा वितरणाचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  'डिजिटली सक्षम, नागरिक-केंद्रित आणि सर्वसमावेशक भारत' या संकल्पनेशी सुसंगत या अद्ययावत ॲप्लिकेशन्सचे लोकार्पण आणि नूतनीकरण केलेल्या टपाल कार्यालय इमारतींचे उद्घाटन  केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया आणि केंद्रीय दूरसंचार आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्र शेखर पेम्मासानी यांच्या हस्ते करण्यात आले. अंतिम टप्प्यातील सेवा वितरणाची यंत्रणा बळकट करणे, नागरिकांना अधिक चांगला अनुभव देणे आणि 'भारतीय टपाल विभागा'च्या डिजिटल परिवर्तनाला गती देणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.

तंत्रज्ञान, धोरणात्मक सुधारणा, संघटनात्मक बदल आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या आधारे टपाल विभागात व्यापक परिवर्तन घडवून आणले जात असल्याचे केंद्रीय दूरसंचार आणि 'ईशान्य प्रदेश विकास' खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया  यांनी सांगितले. 'डाक सेवा' आणि 'डाक मित्रसुरु करण्यामागील भूमिका विशद करताना ते म्हणाले की, हे उपक्रम टपाल सेवा अधिक सुलभ, वापरण्यास सोप्या आणि भारतातील नागरिकांच्या प्रत्येक  पिढीसाठी उपयुक्त बनवण्यास विभाग वचनबद्ध असल्याचे दर्शविणारे आहेत. 'इंडिया पोस्ट'च्या विचारसरणीत, काम करण्याच्या आणि नागरिकांना सेवा देण्याच्या पद्धतीत परिवर्तन होत असल्याचे नमूद करत त्यांनी या प्लॅटफॉर्म्सचा विकास आणि टपाल नेटवर्कचे आधुनिकीकरण करणाऱ्या चमूंचे अभिनंदन केले.

'डाक सेवा ॲप' च्या माध्यमातून नागरिकांना 24x7 टपाल सेवा पुरविण्यात येते; यामध्ये ट्रॅकिंग, बुकिंग, तक्रार निवारण, टपाल कार्यालय आणि पिन कोड शोधणे आणि आर्थिक गणन यंत्रे यांसारख्या सुविधांचा समावेश असून 'भाषिणी' च्या आधारे 23 भारतीय भाषांमधून वापर करण्यासाठी ते सहाय्यक आहे.

 

आज उद्घाटन करण्यात आलेल्या 14 टपाल कार्यालयांमध्ये कांदिवली पश्चिम (मुंबई) तसेच शंकर नगर आणि अयोध्या नगर (नागपूर) येथील टपाल कार्यालयांचा समावेश आहे.

***

सुषमा काणे/मंजिरी गानू/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2302954) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati