पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सेल म्हणजेच, भारतीय पोलाद प्राधिकरण लिमिटेड ने एमएमडीआर सुधारणा कायदा 2026 चे केले स्वागत; या सुधारणा खनिज सुरक्षा आणि देशांतर्गत लोहखनिज उपलब्धतेला देणार पाठबळ

प्रविष्टि तिथि: 20 AUG 2026 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026

केंद्र सरकारने 17 ऑगस्ट 2026 रोजी अधिसूचित केलेल्या, खाण आणि खनिजे सुधारणा कायदा, 2026 चे सेल म्हणजेच, भारतीय पोलाद प्राधिकरण लिमिटेड ने स्वागत केले आहे. खाणकाम क्षेत्रात, एक अत्यंत महत्वाची ठरणारी ही सुधारणा निश्चित वित्तीय चित्र आणि दीर्घकालीन धोरण निश्चिती आणण्यासाठी, महत्वाच्या ठरतील, असे या कंपनीने  म्हटले आहे.

खाणकाम विषयक कर तसेच शुल्करचनेत यामुळे, अधिक स्पष्टता आणि एकसमानता येणार आहे. त्याशिवाय, या सुधारणांमुळे, प्रलंबित शुल्कविषयक प्रश्नही पूर्वलक्षी प्रभावाने सोडवले जाणार असून, त्यामुळे खनिज उद्योगाला, एक निश्चितता आणि आत्मविश्वास मिळणार आहे.

मोठ्या प्रमाणावर स्व-मालकीच्या लोहखनिज आणि कोळसा खाणकामाचे कामकाज असलेल्या सेल साठी, या सुधारणेमुळे खाणकामाच्या कार्याची व्यवहार्यता सुधारण्यास, गुंतवणूक आणि खाण विकासाला चालना देण्यास तसेच दीर्घकालीन कच्च्या मालाची सुरक्षितता बळकट करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. वित्तीय व्यवस्थेत अधिक स्थैर्यआणि अंदाज वर्तवण्याच्या निश्चिततेमुळे,  खनिज संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि विकासाला पाठबळ मिळेल तसेच लोहखनिजाच्या खाणकामाला चालना मिळेल.

त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे या सुधारणांमुळे, देशांतर्गत बाजारात लोहखनिजाची उपलब्धता वाढेल, त्याच्या कॅपटीव्ह खाणींमध्ये अधिक चांगली व्यवहार्यता आणि विकास यामुळे, सेलला विक्री साठी अधिक लोहखनिज उपलब्ध असेल. यामुळे देशांतर्गत पुरवठा साखळी अधिक बळकट होईल आणि भारतीय पोलाद उद्योगासाठी देशांतर्गत लोहखनिजाची उपलब्धता सुनिश्चित करण्यास मदत होईल.

या सुधारणेमुळे, देशात या क्षेत्रात अधिक गुंतवणूक आणि उत्पादन होण्याची शक्यता आहे, आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, खनिज आणि ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होईल आणि खनिज आधारित उद्योगांमधे स्पर्धात्मकता वाढेल.

आपल्या खनिज संसाधनांचा जबाबदार आणि शाश्वत विकास करण्यासाठी, स्वमालकीच्या कच्च्या मालाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोहखनिज उपलब्ध करून देण्यासाठी  सेल कंपनी कटिबद्ध आहे.


सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2301597) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Bengali , Kannada