सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नशा मुक्त भारत अभियान पोर्टल (nmba.dosje.gov.in) आता ‘समावेश’ (SAMAVESH) पोर्टलवर (https://www.dosje.gov.in/organisation/nasha-mukt-bharat-abhiyaan/) यशस्वीरित्या स्थलांतरित

Posted On: 19 AUG 2026 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्‍ट 2026

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने (DoSJE) नशा मुक्त भारत अभियानाचे (NMBA) पोर्टल पूर्वीच्या प्लॅटफॉर्मवरून (nmba.dosje.gov.in) नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजनने (NeGD) विकसित केलेल्या समावेश (SAMAVESH) पोर्टलवर (https://www.dosje.gov.in/organisation/nasha-mukt-bharat-abhiyaan/) स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण केले आहे.

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातील संयुक्त सचिव (मादक पदार्थ प्रतिबंध) डॉ. संदीप आर. राठोड यांनी माहिती दिली की, NMBA पोर्टल आता नवीन लिंक्स आणि QR कोड्सद्वारे उपलब्ध आहे. यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

1. NMBA पोर्टल: https://www.dosje.gov.in/organisation/nasha-mukt-bharat-abhiyaan

2. NMBA e-Pledge: https://nashamukt.dosje.gov.in/epledge

3. नशा मुक्ती मित्र नोंदणी: https://nashamukt.dosje.gov.in/nasha-mukti-mitr

4. NMBA लॉगिन: https://nashamukt-admin.dosje.gov.in/login

5. NMBA मोबाईल ॲप: https://play.google.com/store/search?q=nasha+mukt+bharat+abhiyan&c=apps&hl=en

डॉ. राठोड यांनी सांगितले की, यशस्वी स्थलांतरानंतर पूर्वीचे NMBA पोर्टल (https://nmba.dosje.gov.in/) बंद करण्यात आले असून ते आता उपलब्ध असणार नाही.

नशा मुक्ती मित्र नोंदणी QR कोड

NMBA मोबाईल ॲप

मंत्राल्याने सर्व संबंधित मंत्रालयांना/विभागांना NMBA पोर्टल, ई-प्लेज आणि मित्र नोंदणीसाठी नवीन लिंक्स वापरण्यास सांगितले आहे. सर्व भागधारकांनी  NMBA पोर्टलवरील सर्व पुढील व्यवहार नवीन समावेश (SAMAVESH) पोर्टल लिंक्सद्वारेच होतील याची खात्री करावी आणि अधिकृत पत्रव्यवहार, वेबसाइट्स, IEC साहित्य किंवा इतर दस्तऐवजांमधील जुन्या पोर्टल लिंकचे संदर्भ त्यानुसार अपडेट करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. इतर कोणताही निर्णय न झाल्यास विद्यमान लॉगिन क्रेडेंशियल्स वैध राहतील.

NMBA ई-प्रतिज्ञा QR कोड

सर्व उपक्रम, अहवाल सादर करणे (reporting), ई-प्रतिज्ञा, नशा मुक्ती मित्र नोंदणी आणि पोर्टल-आधारित इतर सर्व कार्ये यापुढे नवीन पोर्टलद्वारेच पार पाडली जातील.

काही स्पष्टीकरण आवश्यक असल्यास, सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे अवर सचिव अरुण कुमार कर्ण यांच्याशी usdp1-dosje[at]gov[dot]in वर संपर्क साधला जाऊ शकतो.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2301349) अभ्यागत कक्ष : 90