ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या अध्यक्षतेखाली आठव्या ब्रिक्स युवा ऊर्जा शिखर परिषद 2026 चे आयोजन


ब्रिक्स ऊर्जा सहकार्याच्या केंद्रस्थानी युवा शक्ती

प्रविष्टि तिथि: 19 AUG 2026 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्‍ट 2026

 

भारताकडे ‘ब्रिक्स’ अध्यक्षपद असून, त्या अंतर्गत 17 ऑगस्ट 2026 रोजी 'आठव्या ब्रिक्स युवा ऊर्जा शिखर परिषदेचे' आभासी पद्धतीने आयोजन केले. या शिखर परिषदेत 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात शिक्षण क्षेत्रातील युवा ऊर्जा व्यावसायिक, सरकारी संस्था आणि ब्रिक्स सदस्य देशांच्या ऊर्जा मंत्रालयाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. ब्रिक्स युवा ऊर्जा संस्था (ब्रिक्स वायईए) तसेच सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा (एसईफॉरऑल), आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) आणि आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्था (आयआरईएनए) यासह आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी देखील शिखर परिषदेत सहभागी झाले होते.

भारताचे ब्रिक्स 2026 अध्यक्षपद हे, 'लवचिकता, नवोन्मेश, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी' या मुख्य संकल्पनेवर आधारित आहे. 'ऊर्जा' या क्षेत्रांतर्गत, भारताने "सर्वेषां ऊर्जम्" (सर्वांसाठी ऊर्जा) ही संकल्पना स्वीकारली आहे. ही संकल्पना ब्रिक्स देशांमध्ये सर्वांना परवडणारी आणि समावेशक ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित करण्याची भारताची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.

नवोन्मेश, उद्योजकता, तांत्रिक प्रगती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणारा प्रमुख घटक म्हणून युवा वर्गाचे महत्व ओळखून, शिखर परिषदेने तरुणांना ब्रिक्स ऊर्जा सहकार्याच्या केंद्रस्थानी ठेवले आहे. ब्रिक्स देशांमधील युवा व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्र, सरकारी संस्था आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या महत्त्वावरही चर्चेत भर देण्यात आला.

संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता विकास उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांच्या सहभागाचे व्यावहारिक परिणामांमध्ये रूपांतर करण्याचे महत्त्व या चर्चांमध्ये अधोरेखित करण्यात आले. (i) ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, (ii) ऊर्जा उपलब्धता आणि समता, आणि (iii) तंत्रज्ञान आणि नवोन्मेश या तीन प्राधान्य क्षेत्रांतर्गत, 20 हून अधिक युवा पॅनेल सदस्यांनी महत्त्वाच्या विषयांवर आपापल्या देशाचे दृष्टिकोन आणि अनुभव मांडले. ऊर्जा मिश्रणाचे वैविध्यीकरण, लवचिक ऊर्जा पुरवठा साखळ्या, ऊर्जेची उपलब्धता आणि नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, तसेच ऊर्जा प्रणालींचे डिजिटलायझेशन या विषयांचा यात समावेश होता.

स्वच्छ ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी लवचिक आणि वैविध्यपूर्ण ऊर्जा प्रणाली, परवडणारी आणि  समावेशक ऊर्जा उपलब्धता आणि नाविन्यपूर्ण आणि परवडणारी वित्तपुरवठा व्यवस्था याच्या आवश्यकतेबाबत या चर्चांमध्ये व्यापक सहमती दिसून आली. विश्वसनीय ऊर्जा-विषयक माहिती, आंतर-कार्यक्षमता, सायबर सुरक्षा आणि कुशल मनुष्यबळ यांच्या आधारे होणारे तांत्रिक नवोपक्रम आणि डिजिटलायझेशन याला कार्यक्षम, लवचिक आणि कोणत्याही आव्हानाचा सामना करणाऱ्या ऊर्जा प्रणालींचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून ओळखले गेले.

भारतातील युवा प्रतिनिधींनी ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा उपलब्धता, स्वच्छ ऊर्जा उपयोजन आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांमधील प्रमुख राष्ट्रीय उपक्रम आणि कामगिरीवर प्रकाश टाकला,  त्यामध्‍ये  पीएम- कुसुम, पीएम सूर्या घर, शांती कायदा, सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) आणि इंडिया एनर्जी स्टॅक (आयईएस) यांचा समावेश आहे. त्यांनी ऊर्जा स्रोतांच्या मिश्रणात विविधता आणणे, वितरण पायाभूत सुविधा बळकट करणे आणि विकेंद्रित अक्षय ऊर्जा आणि डिजिटलायझेशनला चालना देणे यामधील भारताचा अनुभवही सामायिक केला, तसेच स्मार्ट ग्रिड्स, ऊर्जा साठवणूक आणि ग्रिड लवचिकता या क्षेत्रांतील ज्ञानाची देवाणघेवाण, क्षमता-बांधणी आणि सहकार्यासाठी 'स्मार्ट ग्रिड्स आणि ऊर्जा साठवणूकविषयक ब्रिक्स डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्स' (डीसीओई) हे एक व्यासपीठ असल्याचे अधोरेखित केले.

'सर्वांसाठी ऊर्जा' या संकल्पनेला अनुसरून, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यात आणि सुरक्षित, शाश्वत, समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अशा ऊर्जा क्षेत्रासाठी उपाययोजना निश्चित करण्यात ब्रिक्स युवा वर्गाची महत्वाची भूमिका असल्याचे 'आठव्या ब्रिक्स युवा ऊर्जा शिखर परिषद 2026 मध्ये पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2301242) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Telugu , Kannada