राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
सीआरपीएफ द्वारा संकलित अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे 2026 या कालावधीत सीआरपीएफच्या 19 जवानांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून घेतली दखल
2025 मध्ये सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या आत्महत्यांची संख्या सर्वाधिक 59 इतकी नोंदवली गेली
आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालयाचे गृह सचिव आणि सीआरपीएफ चे महासंचालकांना नोटीस बजावून या प्रकरणाबाबत दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2026 12:45PM by PIB Mumbai
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने माध्यमातील एका वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे; या वृत्तानुसार, 1 जानेवारी ते 22 मे 2026 या पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 19 जवानांनी आत्महत्या केली. सीआरपीएफच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, 2025 मध्ये आत्महत्येमुळे या दलातील 59 जवानांचा मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांतील आत्महत्येची ही सर्वाधिक संख्या होती.
आयोगाने निरीक्षण नोंदवले आहे की, जर हे वृत्त खरे असेल, तर देशातील सर्वात मोठ्या 'केंद्रीय सशस्त्र पोलीस दला'त कार्यरत असलेल्या जवानांच्या 'जगण्याच्या अधिकाराचे' उल्लंघन होत असल्याचा गंभीर मुद्दा यातून उपस्थित होतो. त्यामुळे, आयोगाने गृह मंत्रालयाचे गृह सचिव आणि सीआरपीएफचे महासंचालक यांना नोटीस बजावून या प्रकरणाबाबत दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
माध्यमांमध्ये 11 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये एकूण 281 सीआरपीएफ जवानांनी आत्महत्या केली. यापैकी सुमारे 216 जवान कर्तव्यावर असताना आत्महत्या करून मृत्युमुखी पडले. सीआरपीएफ मध्ये 2021 मध्ये 57, 2022 मध्ये 43, 2023 मध्ये 57, 2024 मध्ये 46 आणि 2025 मध्ये 59 आत्महत्यांची नोंद झाली होती.
***
नितीन फुल्लुके / सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299381)
आगंतुक पटल : 10