रेल्वे मंत्रालय
रेलवन ॲप डाउनलोडने गाठला 4.76 कोटीचा टप्पा, दररोज सरासरी 10 लाख तिकिटांचे होते बुकिंग
प्रविष्टि तिथि:
12 AUG 2026 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2026
आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटांची डिजिटल पद्धतीने खरेदी केले जावे, यासाठी प्रोत्साहन म्हणून रेल्वेने 01.07.2025 रोजी 'रेलवन ॲप' सुरू केले आहे. या ॲपद्वारे प्रवासी मोबाईल फोनवर आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटे बुक करू शकतात.
या ॲपद्वारे भारतीय रेल्वेच्या आरक्षित तिकीट, अनारक्षित तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट, गाडीची चौकशी, पीएनआर चौकशी, रेलमॅड इत्यादी सर्व सार्वजनिक सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणल्या आहेत.दिनांक 02.08.2026 रोजी रेलवन ऍपच्या माध्यमातून झालेले व्यवहार पुढीलप्रमाणे आहेत: -
| दैनिक सरासरी तिकिटे |
10 लाख |
| आरक्षित तिकीटे |
2.79 लाख |
| अनारक्षित तिकीटे |
7.24 लाख |
| डाऊनलोड |
4.76 कोटी |
01.08.2026.ऑक्टोबर 2014 (अँड्रॉइड) आणि ऑक्टोबर 2015 (आयओएस) मध्ये प्रारंभ झालेल्या एनटीईएस मोबाईल ॲप्लिकेशनने, 01.08.2026 पर्यंत अँड्रॉइडवर 4.5 कोटींहून अधिक आणि आयओएसवर 16 लाख डाउनलोड्सची नोंद केली आहे.सध्या, एनटीईएस एकाच वेळी सुमारे 80,000 वापरकर्त्यांना त्वरित सेवा देऊ शकते आणि दररोज 6 कोटींहून अधिक चौकशांची पूर्तता करु शकते. प्रवाशांनी या पध्दतीची प्रशंसा केली आहे.
राष्ट्रीय रेल्वे चौकशी प्रणाली (NTES) च्या अंमलबजावणीमुळे, प्रवाशांना संकेतस्थळ, मोबाईल ॲप्लिकेशन्स आणि रेल्वे चौकशी क्रमांक 139 यांसारख्या अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे रेल्वेगाड्यांच्या धावण्याच्या अचूक वेळा आणि जवळपास बिनचूक (रिअल-टाइम) माहितीचा सहज प्रवेश मिळतो, ज्यामुळे प्रवाशांना रेल्वे चौकशी केंद्रांना भेट देण्याची गरज लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
परिणामी, यामुळे चौकशी केंद्रांवरील रांगा आणि प्रतीक्षेचा कालावधी कमी होण्यास मदत झाली आहे.
गाडी रद्द झाल्यास, एनजीईटी (नेक्स्ट जनरेशन ई-तिकिटिंग) ही ऑनलाइन ई-तिकीट प्रणालीद्वारे गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेनंतर लगेचच परताव्याची प्रक्रिया आपोआप सुरू होते आणि लागू असलेला परतावा प्रवाशाच्या बँक खात्यात जमा केला जातो.गाडी रद्द झाल्यास स्वयंचलित पद्धतीने मिळणारा परतावा सध्या फक्त ऑनलाइन बुक केलेल्या ई-तिकिटांसाठीच उपलब्ध आहे आणि तो तिकीट खिडकीवरून काढलेल्या तिकिटांसाठी उपलब्ध नाही.अशा परिस्थितीत, तिकीट रद्द करायचे असल्यास प्रवाशाला जवळच्या पीआरएस काउंटरला भेट देणे गरजेचे आहे.
2013-14 मधील सुमारे 49% च्या तुलनेत, सध्या आरक्षित तिकिटांपैकी अंदाजे 89% तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात. विविध चुकीच्या माध्यमांद्वारे बुक केलेल्या अनारक्षित तिकिटांचे प्रमाण जवळपास 39%. पर्यंत वाढले आहे.
ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
* * *
सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2298633)
आगंतुक पटल : 13