गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारने आणखी 11 आंतरराष्ट्रीय बंदरे अधिसूचित केली असून, यामुळे ई-व्हिसाधारक परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश करणे होणार सुकर

Posted On: 10 AUG 2026 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026

सरकारने ई-व्हिसा धारक परदेशी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय बंदरांना मान्यता दिली आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या 11 आंतरराष्ट्रीय बंदरांमध्ये नउू  भू-सीमा प्रवेशद्वारे आणि दोन विमानतळांचा समावेश आहे. या 11 अतिरिक्त प्रवेशद्वारांमुळे 'इलेक्ट्रॉनिक-व्हिसाची उपयुक्तता आणि आकर्षिततेत अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ई-व्हिसासाठीच्या सुमारे 95% अर्जांवर भारतात 72 तासांपेक्षा कमी कालावधीत कार्यवाही पूर्ण होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली,  सरकारने गेल्या काही वर्षांत व्हिसा प्रणाली अधिक उदार, कार्यक्षम आणि सुलभ करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. याचा उद्देश कायदेशीर परदेशी प्रवाशांना सुविधा देणे आणि त्याच वेळी अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी तांत्रिक पायाभूत सुविधांचा विस्तार करणे हा आहे.

या नवीन समावेशामुळे, ई-व्हिसा धारक परदेशी नागरिकांना प्रवेश देणाऱ्या आंतरराष्ट्रीय बंदरांची एकूण संख्या 88 झाली आहे; यामध्ये 37 विमानतळे, 38 सागरी बंदरे आणि 13 भू-सीमा बंदरांचा समावेश आहे.

भारतात 'ई-व्हिसा धारक परदेशी नागरिकांना प्रवेश देणाऱ्या आंतरराष्ट्रीय बंदरांची अद्ययावत यादी

Sl. No.

Airports

Seaports

Landports

  1.  

Ahmedabad

Agatti

Raxaul

  1.  

Amritsar

Alang

Rupaidiha

  1.  

Bagdogra

Bedi Bandar

Darranga

  1.  

Bhogapuram

Bhavnagar

Jogbani

  1.  

Bengaluru

Calicut

Agartala (Newly Added)

  1.  

Bhubaneswar

Chennai

Darranga (Newly Added)

  1.  

Calicut

Cochin

Gede (Newly Added)

  1.  

Chandigarh

Cuddalore

Ghojadanga (Newly Added)

  1.  

Chennai

Dahej

Haridaspur (Newly Added)

  1.  

Cochin

Dhamra

Jaigaon (Newly Added)

  1.  

Coimbatore

Haldia

Dawki (Newly Added)

  1.  

Delhi

Hazira

Moreh (Newly Added)

  1.  

Gaya

Kakinada

Attari (Road) (Newly Added)

  1.  

Goa (Dabolim)

Ennore – Kamarajar

 

  1.  

Goa (Mopa)

Kandla

 

  1.  

Guwahati

Karaikal

 

  1.  

Hyderabad

Kattupalli

 

  1.  

Indore

Kolkata

 

  1.  

Jaipur

Kollam

 

  1.  

Kannur

Krishnapatnam

 

  1.  

Kolkata

Mandvi

 

  1.  

Lucknow

Mormugao

 

  1.  

Madurai

Mumbai

 

  1.  

Mangalore

Mundra

 

  1.  

Mumbai

Nagapattinam

 

  1.  

Nagpur

New Mangalore

 

  1.  

Navi Mumbai

Nhava Sheva

 

  1.  

Port Blair

Paradeep

 

  1.  

Pune

Pipavav

 

  1.  

Surat

Porbandar

 

  1.  

Thiruvananthapuram

Port Blair

 

  1.  

Trichy

Sikka

 

  1.  

Varanasi

Tuna Tekra

 

  1.  

Vijaywada

Tuticorin

 

  1.  

Visakhapatnam

Vallarpadam

 

  1.  

Bhopal (Newly Added)

Visakhapatnam

 

  1.  

Tirupati (Newly Added)

Vizhinjam – Kovalam

 

  1.  

 

Vizhinjam

 

Total

37

38

13

ई-व्हिसा

भारतीय व्हिसा प्रणाली, विशेषतः पर्यटक व्हिसा प्रणाली, अधिक सुलभ आणि उदार करण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे 'ई-व्हिसा' सुविधेची सुरुवात. 2014 मध्ये 'इलेक्ट्रॉनिक प्रवास प्रमाणीकरण' (ई टी ए) सह ई-व्हिसा सुविधा 43 देशांच्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आली होती. सध्या ही सुविधा 172 देशांच्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे.

ई-व्हिसा सध्या पुढील 17 उप-श्रेण्यांअंतर्गत उपलब्ध आहे:

Sl. No.

Category

  1.  

Tourist

  1.  

Mountaineering

  1.  

B-1

B-2

B-3                         (Business Visa)

B-4

B-5

B-6

  1.  
  1.  
  1.  
  1.  
  1.  
  1.  

M-1

M-2                         (Medical Visa)

M-3

M-4

  1.  
  1.  
  1.  
  1.  

S-1

S-2                          (Student Visa)

  1.  
  1.  

Transit

  1.  

X-1 (Miscellaneous)

  1.  

Group Visitor Visa (Cruise)

भारतात आता सुमारे 78% व्हिसा 'इलेक्ट्रॉनिक व्हिसा' म्हणून जारी केले जातात हे नमूद करणे समयोचित ठरेल.


सुवर्णा बेडेकर/संदेश नाईक/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2297415) अभ्यागत कक्ष : 79