पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
Posted On:
09 AUG 2026 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्साहाने सहभागी होण्याचे आणि विकसित भारत उभारण्यासाठी आपला सामूहिक संकल्प दृढ करण्याचे आवाहन केले आहे. तिरंगा हा भारताच्या अभिमानाचे प्रतीक असून प्रत्येक नागरिकाला देशासाठी सर्वोत्तम योगदान देण्यास, हा राष्ट्रध्वज सतत प्रेरणा देत असतो, असे पंतप्रधान म्हणाले.
देश ‘वंदे मातरम्’चे 150 वे वर्ष साजरे करत असताना यंदा ‘हर घर तिरंगा’ अभियान राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ला समर्पित करण्यात आल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या माध्यमावर लिहिले:
“आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे आणि देशासाठी नेहमी सर्वोत्तम कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा स्रोत आहे.
चला, आपण सगळे #HarGharTiranga या अभियानात उत्साहाने सहभागी होऊया आणि विकसित भारत उभारण्यासाठी आपला सामूहिक संकल्प बळकट करूया. यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’ला समर्पित आहे, आणि त्याच वेळी आपण राष्ट्रगीताची 150 वी वर्षपूर्ती साजरी करत आहोत, याचा मला आनंद आहे.”
https://harghartiranga.com
* * *
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296902)
अभ्यागत कक्ष : 73
Read this releasein:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam