नागरी उड्डाण मंत्रालय
फुकेत ते दिल्ली दरम्यान 4 ऑगस्ट 2026 रोजी, एअर इंडियाच्या व्हीटी-इएक्सओ विमानाच्या एआय 2379 या उड्डाणादरम्यान प्रवासात मुख्य टप्प्यावर विमान अचानक कमी उंचीवर जाणे आणि दुखापतीची घटना
Posted On:
09 AUG 2026 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2026
फुकेत ते दिल्ली दरम्यान 04 ऑगस्ट रोजी एआय 2379 उड्डाण केलेले एअर इंडियाचे ए 320 व्हीटी-इएक्सओ हे विमान, प्रवासादरम्यान अचानक 300 फुटांनी कमी उंचीवर आले. त्यानंतर विमान स्थिर झाले आणि नंतर ते दिल्लीत सुरक्षितपणे उतरले.
या घटनेवेळी काही प्रवासी आणि काही विमान कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे. विमानामध्ये 137 प्रवासी, ज्यामध्ये 3 नवजात बालके आणि दोन वैमानिक आणि सहा विमान कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
प्रमाणित कार्यपद्धतींचा भाग म्हणून या घटनेनंतर, दोन्ही विमान कर्मचाऱ्यांची सायकोअॅक्टिक अमली पदार्थ सेवन तपासणी करण्यात आली. वैमानिकाच्या तपासणीच्या अहवालातून पुन्हा पडताळा करण्यासाठी आणखी चाचणीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, घेतलेले नमुने पुन्हा विश्लेषणासाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे आणि त्याच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.
ही गंभीर घटना असल्याचे नमूद करण्यात आले असून, विमान अपघात तपासणी विभागाकडून याची चौकशी करण्यात येत आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि विहित प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दोन्ही विमान कर्मचाऱ्यांना कर्तव्यावरून हटवले आहे. या चौकशीचा निष्कर्ष आणि दुसऱ्या चाचणीचे निकाल यांवर आधारित पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं हवाई सुरक्षेचे सर्वोच्च निकष राखण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यात येईल आणि विहित नियम आणि कार्यपद्धतींनुसार योग्य ती कारवाई करण्यात अशी ग्वाही महासंचालनालयाने दिली आहे.
* * *
राधिका अघोर/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296867)
अभ्यागत कक्ष : 63