माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत मद्य आणि तंबाखूविषयक सामग्रीचे वर्गीकरण अनिवार्य
आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी त्रि-स्तरीय यंत्रणा
Posted On:
07 AUG 2026 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026
डिजिटल माध्यमांवरील बातम्या आणि चालू घडामोडींचे प्रसारक आणि ऑनलाइन क्युरेटेड सामग्री (ओटीटी प्लॅटफॉर्म) प्रसारित करणाऱ्यांसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने 25.02.2021 रोजी, केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान (मध्यवर्ती मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल माध्यम, आचार संहिता) नियम, 2021 अधिसूचित केले आहेत.
नियमांचा भाग-III डिजिटल बातम्या प्रकाशक आणि ऑनलाइन क्युरेटेड सामग्री (ओटीटी प्लॅटफॉर्म) च्या प्रकाशकांसाठी आचारसंहिता प्रदान करतो.
आचारसंहितेनुसार, ओटीटी मंचांनी कायद्याने प्रतिबंधित केलेला कोणताही आशय प्रसारित करू नये, योग्य ती खबरदारी आणि विवेक बाळगावा, तसेच पुढील नियमावलीनुसार आशयाचे वर्गीकरण करावे: i) संकल्पना आणि संदेश ii) हिंसा iii) नग्नता iv) लैंगिकता v) भाषा vi) अमली पदार्थ आणि त्याचा गैरवापर आणि vii) भयपट.
माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 च्या अनुसूचीच्या भाग II मध्ये आशयाच्या वर्गीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. यात सायकोट्रॉपिक (मानसिक स्थितीवर परिणाम करणारे) पदार्थ, मद्य, धूम्रपान आणि तंबाखू आणि अनुकरणीय वर्तन' याचा समावेश असलेल्या सामग्रीचा समावेश आहे.
आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारींचे निवारण त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणेच्या तरतुदींनुसार केले जाते आणि मंत्रालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारी आयटी नियम, 2021 अनुसार निवारणासाठी संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मकडे पाठवल्या जातात.
सरकारने 26.11.2024 रोजी ऑनलाइन क्युरेटेड सामग्रीच्या (ओटीटी प्लॅटफॉर्म्स) प्रकाशकांसाठी, अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक (मानसिक स्थितीवर परिणाम करणारे) पदार्थांशी संबंधित आशय प्रसारित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज राज्यसभेत हरीस बीरन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296400)
अभ्यागत कक्ष : 48