वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंधन मिश्रणासाठी अमेरिकेतून इथेनॉलच्या आयातीवर कोणतीही सवलत किंवा बाध्यता नाही

Posted On: 06 AUG 2026 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026

भारत अमेरिकेकडून इंधन मिश्रणासाठी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल आयात करत असल्याचा किंवा अशी आयात करण्याचा मानस असल्याचा माध्यमांमध्ये करण्यात येणारा दावा निराधार आणि वस्तुस्थितीविरुद्ध आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत इंधनासाठी वापरले जाणारे इथेनॉल हे विद्यमान देशांतर्गत धोरणानुसार पूर्णपणे देशातल्याच उत्पादकांकडूनच खरेदी केले जाते. इंधन मिश्रणासाठी अमेरिकेतून इथेनॉलची कोणतीही आयात केली जात नाही.

याशिवाय, भारत- अमेरिका व्यापार चर्चेदरम्यान अमेरिकेतून इंधन मिश्रणासाठी इथेनॉल आयातीसंदर्भात कोणतीही सवलत किंवा बाध्यता नाही. त्यामुळे अमेरिकेतून इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल आयात करण्यास परवानगी देण्यासाठी धोरणात बदल करण्यात येत असल्याचे कोणतेही दावे दिशाभूल करणारे आहेत. भारताचा इंधन मिश्रण कार्यक्रम आणि इथेनॉल खरेदी प्रक्रिया या केवळ भारताच्या देशांतर्गत धोरणात्मक आवश्यकतांनुसारच सुरू आहेत.


राधिका अघोर/राज दळेकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2295734) अभ्यागत कक्ष : 90