पंतप्रधान कार्यालय
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा
दोन्ही नेत्यांकडून भारत-इस्रायल विशेष धोरणात्मक भागीदारीतल्या प्रगतीचा आढावा
उभय नेत्यांनी पश्चिम आशियातल्या ताज्या घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली
Posted On:
06 AUG 2026 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
या चर्चेत, दोन्ही नेत्यांनी भारत-इस्रायल विशेष धोरणात्मक भागीदारीतल्या निरंतर प्रगतीचा आढावा घेतला आणि उभय देशांच्या परस्पर हितासाठी विविध क्षेत्रांमधले द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान नेतन्याहू आणि पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातल्या ताज्या घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचेही ठरवले.
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2295726)
अभ्यागत कक्ष : 42
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam