पंतप्रधान कार्यालय
टेड सारंडोस यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2026 11:00PM by PIB Mumbai
नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताकडे कथाकथनाची समृद्ध परंपरा आणि सर्जनशील प्रतिभेचा विलक्षण खजिना असून त्याचा उपयोग आशय निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून देशाचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी केला जाऊ शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले की,
टेड सारंडोस यांना भेटून आनंद झाला. भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रचंड क्षमतेबाबत चर्चा केली.
भारताकडे कथाकथनाची समृद्ध परंपरा आणि सर्जनशील प्रतिभेचा विलक्षण खजिना आहे. ज्याचा उपयोग आशय निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून देशाचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी केला जाऊ शकतो.
***
SushamaKane / RajeshShirbhate / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295328)
आगंतुक पटल : 10