रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेचे देशभरात 19 रेल नीर प्रकल्प कार्यरत; प्रवाशांना सुरक्षित बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा पुरवठा


प्रत्येक रेल नीर प्रकल्पाची प्रति दिन 1 लाख बाटल्यांची क्षमता

Posted On: 05 AUG 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026 

देशभरातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आणि स्थानकांवरील ‘रेल नीर’ या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची मागणी सध्या कार्यरत रेल नीर प्रकल्पांमधून पूर्ण केली जात आहे. भारतीय रेल्वेची ‘रेल नीर’ची आवश्यकता आणि मागणीनुसार निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी रेल नीर प्रकल्प उभारण्याची जबाबदारी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आयआरसीटीसीला सोपविण्यात आली आहे.

1,00,000 बाटल्या प्रति दिन उत्पादन क्षमतेच्या रेल नीर प्रकल्पाच्या (पीपीपी मॉडेल) उभारणीसाठी अंदाजे 10 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चामध्ये प्री-इंजिनिअर्ड बिल्डिंग (पीईबी) शेडचे बांधकाम तसेच प्रकल्पासाठी आवश्यक यंत्र सामग्रीची उभारणी आणि स्थापना यांचा समावेश असून, जमिनीच्या खर्चाचा त्यामध्ये समावेश नाही.

देशभरातील कार्यरत 19 रेल नीर प्रकल्पांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

 क्र.

 प्रकल्प

राज्य

1

नांगलोई

दिल्ली

2

दानापूर

बिहार

3

अंबरनाथ

महाराष्ट्र

4

पालुर

तमिळ नाडू

5

मणेरी

मध्य प्रदेश

6

अमेठी

उत्तर प्रदेश

7

नागपूर

महाराष्ट्र

8

उना

हिमाचल प्रदेश

9

हपूर

उत्तर प्रदेश

10

जागीरोड

असम

11

संकरेल

पश्चिम बंगाल

12

कोटा

राजस्थान

13

मंडीदीप

मध्य प्रदेश

14

साणंद

गुजरात

15

भुसावळ

महाराष्ट्र

16

भुवनेश्वर

ओदिशा

17

बिलासपूर

छत्तीसगढ

18

सिंहाद्री

आंध्र प्रदेश

19

विजयवाडा

आंध्र प्रदेश

केंद्रीय रेल्वे,माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

राधिका अघोर/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2295162) अभ्यागत कक्ष : 46