माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विविध उपक्रमांद्वारे सरकार सुनिश्चित करत आहे पत्रकारांचे कल्याण,आरोग्यसेवा आणि अधिस्वीकृतीचे पाठबळ

प्रविष्टि तिथि: 05 AUG 2026 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026 

पत्रकार किंवा त्यांच्या कुटुंबावर मृत्यू, कायमचे अपंगत्व, गंभीर आजार आणि अपघातामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास निर्माण होणाऱ्या अत्यंत विपरित परिस्थितीत तातडीने एकरकमी सानुग्रह मदत मिळवून देण्यासाठी सरकार 'पत्रकार कल्याण योजना' (JWS) राबवत आहे. पत्र सूचना कार्यालय (PIB) आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे अधिस्वीकृत असलेल्या पत्रकारांसह बिगर-अधिस्वीकृत पत्रकारांनाही या योजनेअंतर्गत समाविष्ट केले जाते.

पत्रकार कल्याण योजनेअंतर्गत, सरकारने 2014-15 ते 2025-26 या काळात 456 पत्रकार/माध्यम कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबांना 19.41 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

पत्र सूचना कार्यालयाकडे  अधिस्वीकृत असलेल्या पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देशभरात 'केंद्र सरकारी आरोग्य योजनेच्या' (CGHS) सुविधांचा लाभ दिला जातो. यामध्ये सरकारी किंवा या योजने अंतर्गत पॅनेलमध्ये समाविष्ट  खाजगी रुग्णालयांमध्ये सीजीएचएस दरांवर उपचारांचा समावेश आहे.

पत्र सूचना कार्यालय राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये पत्रकारांसाठी अधिस्वीकृती  कार्ड जारी करते. सध्याच्या माहितीनुसार, पत्र सूचना कार्यालयाकडे 1786 अधिस्वीकृत पत्रकारांची नोंद  आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी दामोदर अग्रवाल यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

माधुरी पांगे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2295157) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada