राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते पीबीजी 'सोल्जरेथॉन'ला हिरवा झेंडा
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2026 1:56PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (2 ऑगस्ट 2026) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित समारंभात पीबीजी (प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड्स) 'सोल्जरेथॉन' स्पर्धेला आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या कार्यक्रमाला या उपक्रमाचे संरक्षक आणि मिझोरमचे राज्यपाल जनरल (डॉ.) व्ही. के. सिंह (निवृत्त) उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींनी या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष टपाल आवरणाचेही (पोस्टल कव्हरचे) प्रकाशन केले. या शर्यतीचे आयोजन दिल्ली कॅन्टोन्मेंट येथील करिअप्पा परेड मैदानावर करण्यात आले.

'सैनिकांसाठी धावा, सैनिकांसोबत धावा' / 'रन फॉर सोल्जर्स, रन विथ सोल्जर्स' या संकल्पनेवर आधारित 'सोल्जरथॉन' हा नागरिक आणि सशस्त्र दल यांच्यातील दृढ नाते अधिक बळकट करण्याचा एक अनोखा उपक्रम आहे. ‘भारताच्या सशस्त्र दलांना- खऱ्या नायकांना साथ देऊया'/'सपोर्टिंग रिअल हिरोज – द आर्म्ड फोर्सेस ऑफ इंडिया' या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम आपल्या सैनिकांचे समर्पण, शौर्य आणि बलिदान यांना मानवंदना अर्पण करतो. तसेच नागरिकांनी सक्रिय सहभागातून सैनिकांप्रती आपली एकजूट व्यक्त करावी, यासाठीही तो प्रेरणा देतो.

'सोल्जरेथॉन'मध्ये 3कि.मी., 5 कि.मी. आणि 10 कि.मी. अशा तीन श्रेणींमध्ये शर्यती आयोजित करण्यात येतात. या उपक्रमातून प्राप्त होणारा निधी सशस्त्र दलाच्या पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रासाठी, युद्धातील हानीग्रस्त सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी तसेच इतर संबंधित उपक्रमांसाठी वापरला जातो. पीबीजी 'सोल्जराथॉन'चा उद्देश प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड्सच्या घोड्यांना आणि जवानांना सहाय्य करणे हा आहे


***
सुषमा काणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2293446)
आगंतुक पटल : 9