आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी घेतला नीट-पीजी 2026 च्या तयारीचा आढावा; सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थी-केंद्रित सुधारणा
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2026 7:19PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 30 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पदव्युत्तर पात्रता-अर्थात-प्रवेश परीक्षा (नीट-पीजी) 2026 च्या तयारीचा आढावा घेतला, जेणेकरून ही परीक्षा सुरळीत, सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञान-सक्षम पद्धतीने पार पाडली जाईल.
या आढाव्यादरम्यान मंत्र्यांनी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळ (एनबीईएम एस), तंत्रज्ञान भागीदार आणि परीक्षा आयोजित करण्यामध्ये सहभागी असलेल्या इतर हितधारकांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांना परीक्षेची कार्यपद्धती, उमेदवारांसाठीच्या सुविधा उपाययोजना, सुरक्षा रचना आणि नीट-पीजी 2026 साठी सुरू केलेल्या तंत्रज्ञान-आधारित उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली.

सचोटी आणि सुरक्षेचे सर्वोच्च मापदंड कायम ठेवत एक निष्पक्ष, पारदर्शक आणि उमेदवारांसाठी अनुकूल परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला.
उमेदवारांनी परीक्षेसंबंधित अफवा किंवा फसव्या दाव्यांना बळी पडू नये, असे आवाहन जगत प्रकाश नड्डा यांनी केले. त्यांनी अधोरेखित केले की अंतिम प्रश्नपत्रिका परीक्षेच्या काही काळ आधी एका अत्यंत सुरक्षित, एनक्रिप्टेड आणि वेळेची मर्यादा असलेल्या प्रक्रियेद्वारे निवडली जाते, ज्यामध्ये नियोजित वेळेपर्यंत तिची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी तांत्रिक आणि कार्यात्मक सुरक्षेचे अनेक स्तर असतात. त्यामुळे प्रश्नपत्रिका आधीच हाती लागल्याचा कोणाचाही दावा पूर्णपणे खोटा आणि उमेदवारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. त्यांनी इच्छुकांना केवळ एनबीईएमएस आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचा आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा गैरप्रकारांच्या प्रयत्नांची तात्काळ तक्रार करण्याचा सल्ला दिला.

मंत्र्यांनी परीक्षेसाठी करण्यात आलेल्या सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला, ज्यामध्ये परीक्षा केंद्रांना आगाऊ सील करणे व त्यांची पडताळणी, सीसीटीव्ही पाळत, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, उमेदवारांची झडती, सिग्नल जॅमरची तैनाती, डायनॅमिक कॉम्प्युट, केंद्रीय आणि प्रादेशिक कमांड सेंटरमार्फत थेट देखरेख आणि स्वतंत्र निरीक्षक व मूल्यमापनकर्त्यांद्वारे रिअल-टाइम पर्यवेक्षण यांचा समावेश आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी 60,000 हून अधिक परीक्षा अधिकारी तैनात केले जातील.

एन्क्रिप्शनचे अनेक स्तर, सुरक्षित ऑफलाइन तयारी, परीक्षेच्या काही काळ आधी प्रश्नपत्रिकेला वेळेत अंतिम स्वरूप देणे आणि केवळ परीक्षेच्या नियोजित प्रारंभाच्या वेळीच नियंत्रित डिजिटल डिक्रिप्शन करणे यांद्वारे प्रश्नपत्रिकेची संपूर्ण तयारी आणि वितरण प्रक्रिया अधिक मजबूत करण्यात आली आहे.
***
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2293140)
आगंतुक पटल : 11