पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशातील विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यातील भाषणातील ठळक मुद्दे पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
01 AUG 2026 4:54PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे 'एक्स'वरील मालिकाबद्ध संदेशांद्वारे सामायिक केले.
पंतप्रधान म्हणाले :
“भोगपूरम येथील अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल आंध्र प्रदेशातील माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंचे मनःपूर्वक अभिनंदन.
या विमानतळाला अल्लुरी सीताराम राजू यांचे नाव देणे हे आपल्या समृद्ध इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या योगदानाला योग्य सन्मान देण्याच्या आमच्या संकल्पाला अनुरूप आहे.”
“केंद्रातील आणि आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार राज्याच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय वेगाने काम करत आहे. नील अर्थव्यवस्था, बंदर विकास, औद्योगिक प्रगती आणि इतर अनेक क्षेत्रांवर विशेष भर दिला जात आहे.”
“माझे मित्र चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश भविष्याचा विचार करत दृढनिश्चयाने पुढे वाटचाल करत आहे. सेमिकंडक्टर, माहिती तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांसारख्या क्षेत्रांत राज्य कठोर परिश्रम करत असून त्याचा मोठा लाभ राज्यातील युवकांना होणार आहे.”
***
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2293029)
अभ्यागत कक्ष : 53
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam