पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
31 JUL 2026 1:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधान म्हणाले की, आपल्या अजरामर साहित्यिक कलाकृतींमधून मुन्शी प्रेमचंद यांनी मानवी भावना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केल्या. ती अभिव्यक्ती आजही प्रासंगिक आहे. त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या काशीच्या साहित्यिक वारशाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांनी दिलेले अमूल्य योगदानही पंतप्रधानांनी नमूद केले.
वास्तववाद आणि सामाजिक समानतेवर आधारित मुन्शी प्रेमचंद यांचे अजरामर साहित्य देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले;
“महान कथाकार मुन्शी प्रेमचंद जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. आपल्या अजरामर रचनांच्या माध्यमातून त्यांनी मानवी संवेदनांना दिलेली सशक्त अभिव्यक्ती आजही प्रासंगिक आहे. आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या काशीच्या साहित्यिक वारशाला जागतिक पटलावर ओळख मिळवून देण्यातही त्यांचे योगदान अमूल्य आहे. वास्तव आणि सामाजिक समानतेवर आधारित त्यांचे अमर साहित्य देशवासियांसाठी सदैव प्रेरणेचा स्रोत राहील.”
***
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2292408)
आगंतुक पटल : 8