पंतप्रधान कार्यालय
निसर्गाविषयी आदर आणि पर्यावरण काळजीपूर्वक संवर्धन करण्यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
30 JUL 2026 2:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,30 जुलै 2026
निसर्ग, पर्यावरण आणि संपूर्ण सृष्टीबद्दलचा आदर हा आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वांना निसर्गाप्रती कृतज्ञतेच्या आणि निःस्वार्थ सेवेच्या भावनेने एक निरोगी, समृद्ध आणि बलवान राष्ट्र घडवण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषितही सामायिक केले आहे-
“शं नो द्यावापृथिवी पूर्वहूतौ शमन्तरिक्षं दृशये नो अस्तु।
शं न ओषधीर्वनिनो भवन्तु शं नो रजसस्पतिरस्तु जिष्णुः॥”
सृष्टीच्या प्रारंभापासून पूजनीय असलेले द्वैलोक आणि पृथ्वी आमच्यासाठी सदैव मंगलमय राहोत, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अवकाश आमच्या जीवनासाठी लाभदायी आणि ज्ञानवर्धक राहो. सर्व औषधी वनस्पती आणि जंगलातील वृक्ष आम्हाला आरोग्य, पोषण आणि आनंद प्रदान करोत; सर्वलोकांचा सर्वव्यापी आणि पराक्रमी स्वामी आम्हाला सदैव कल्याण, शांती आणि समृद्धी प्रदान करो, असे या सुभाषितात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले आहे:
“निसर्ग, पर्यावरण आणि समस्त सृष्टीचा सन्मान हाच आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे. चला या सर्वांप्रती पूर्ण कृतज्ञता, आणि सेवाभाव बाळगत आपण एक निरामय, समृध्द आणि सामर्थ्यवान राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपले योगदान देऊ या!
शं नो द्यावापृथिवी पूर्वहूतौ शमन्तरिक्षं दृशये नो अस्तु।
शं न ओषधीर्वनिनो भवन्तु शं नो रजसस्पतिरस्तु जिष्णुः॥”
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2291647)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam