पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2026 मध्ये, भारोत्तोलनात महिलांच्या 69 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल हरजिंदर कौर यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
29 JUL 2026 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,29 जुलै 2026
ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2026 मध्ये भारोत्तोलनात, महिलांच्या 69 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल, हरजिंदर कौर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
हरजिंदर यांची ही कामगिरी त्यांची स्वतःची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे हे नमूद करत पंतप्रधानांनी राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या भारोत्तोलकांची अशी उत्कृष्ट कामगिरी पाहून खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.
मोदी यांनी हरजिंदर कौर यांना भविष्यातील त्यांच्या पुढील प्रवासासाठी आणि प्रयत्नांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर लिहिले आहे;
"ग्लासगो येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, भारोत्तोलनात महिलांच्या 69 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल हरजिंदर कौर यांचे खूप खूप अभिनंदन. कालची त्यांची ही कामगिरी आजवरची त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. या स्पर्धेत आपले भारोत्तोलक इतकी उत्तम कामगिरी बजावताना पाहून मनापासून आनंद होत आहे. हरजिंदरना, त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीसाठी माझ्या अनेक शुभेच्छा.”
#CWG2026"
शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2291477)
आगंतुक पटल : 11