पंतप्रधान कार्यालय
ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धा 2026 मध्ये,भारोत्तोलन प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरी यादवचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
27 JUL 2026 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2026
ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये,भारोत्तोलन प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरी यादवचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
तिने या स्पर्धेत आपली आजवरची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी केली आहे, त्यामुळे, तिचे यश अधिकच वाखाणण्याजोगे आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तिचे यश, देशातील युवांना प्रेरणा देईल, अशा भावना व्यक्त करत, तिच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स वरच्या आपल्या पोस्ट मध्ये,पंतप्रधान म्हणतात: -
"ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत, भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरी यादव हिचे मनःपूर्वक अभिनंदन. विशेष म्हणजे, या स्पर्धेत तिने स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत हे यश मिळवले आहे, त्यामुळे, त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. तिच्या या यशातून भारतातील युवकांना प्रेरणा मिळो. तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा."
#CWG2026"
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2290186)
अभ्यागत कक्ष : 47
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada