पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात रौप्यपदक मिळवल्याबद्दल राजा मुथुपंडी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 27 JUL 2026 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,27 जुलै 2026

भारोत्तोलनात भारताला आणखी एक पदक मिळाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खास उल्लेख केला आहे. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांनी राजा मुथुपंडी यांचे अभिनंदन केले.

त्यांच्या या यशाचा प्रत्येक भारतीयाला आनंद आणि अभिमान वाटतो असे मोदींनी म्हटले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'एक्स'समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात:

"भारताला भारोत्तोलनात आणखी एक पदक!

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवल्याबद्दल राजा मुथुपंडी यांचे अभिनंदन. त्यांच्या या यशाचा प्रत्येक भारतीयाला आनंद आणि अभिमान वाटत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा.

#CWG2026"

निलीमा चितळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2289866) अभ्यागत कक्ष : 49