पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जवानांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
27 JUL 2026 3:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,27 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सीआरपीएफ ने आपले अतुल्य शौर्य आणि कर्तव्याप्रती अद्वितीय निष्ठा दाखवून आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे संरक्षण करण्यासह, अत्यंत आव्हानात्मक स्थितीत नागरिकांची सेवा करण्यापर्यंत, प्रत्येक वेळी सीआरपीएफ च्या जवानांनी देश प्रथम या तत्वाने काम केले, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याच्या लढाईतले त्यांचे योगदान अधोरेखित करत, त्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात शांतता आणि समृद्धी येण्यात त्यांनी मदत केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात :-
"आजच्या स्थापना दिनानिमित्त सीआरपीएफ च्या जवानांना शुभेच्छा! सीआरपीएफने आपले अढळ शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पणाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करण्यापासून ते आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्यापर्यंत, सीआरपीएफच्या जवानांनी नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य विशेष प्रशंसनीय असून, त्यामुळे अनेकांच्या जीवनात शांतता आणि समृद्धीचा मार्ग मोकळा झाला आहे. @crpfindia""
निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2289856)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam