पंतप्रधान कार्यालय
रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय भारोत्तोलक ऋषीकांत सिंह चनंम्बमविषयी पंतप्रधानांनी व्यक्त केली अभिमानाची भावना
Posted On:
26 JUL 2026 8:49PM by PIB Mumbai
भारतीय भारतीय भारोत्तोलक ऋषीकांत सिंह चनंम्बम याने रौप्यपदक जिंकल्याबद्दल आणि आपली सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमानाची भावना व्यक्त केली. त्याची जिद्द आणि उत्कृष्ट कामगिरीने देशाला अत्यंत आनंद मिळवून दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
मोदी यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, त्याने अशीच उत्तरोत्तर प्रगतीची शिखरे गाठावी आणि अनेक तरुण क्रीडापटूंना प्रेरणा द्यावी अशी इच्छाही व्यक्त केली.
एक्स या समाज माध्यमावरील संदेश सामायिक करताना पंतप्रधान लिहितात-
'रौप्यपदकाला गवसणी घातल्याबद्दल आणि वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी नोंदवण्यासाठी भारतीय भारोत्तोलक ऋषीकांत सिंह चनंम्बम याचा मला खूप अभिमान वाटतो. त्याने जिद्दीने आणि उत्कृष्ट कामगिरीने देशाला अफाट आनंद प्रदान केला आहे. त्याने उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहावी आणि तरुण क्रीडापटूंना प्रेरणा देत रहावी. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!'
#CWG2026"
***
शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2289710)
अभ्यागत कक्ष : 60
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam