पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

2026 च्या जागतिक कनिष्ठ  स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीचे पंतप्रधानांकडून कौतुक

Posted On: 26 JUL 2026 3:28PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2026 च्या जागतिक कनिष्ठ  स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. अनाहत सिंग हिने सुवर्णपदक जिंकून जागतिक कनिष्ठ  स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय स्क्वॉश खेळाडू होण्याचा मान मिळवला. याबद्दल त्यांनी अत्यंत सार्थ अभिमान व्यक्त केला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, या यशामुळे तरुणांमध्ये स्क्वॉश हा खेळ अधिक लोकप्रिय होईल.
एक्स (X) समाजमाध्यमावरील एका टिप्पणीमध्ये पंतप्रधान लिहितात:
"2026 च्या जागतिक कनिष्ठ  स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी.
सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि जागतिक कनिष्ठ  स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय स्क्वॉश खेळाडू ठरल्याबद्दल अनाहत सिंगचा अभिमान वाटतो. या यशामुळे तरुणांमध्ये स्क्वॉश हा खेळ अधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल.
@Anahat_Singh13"

***

सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2289612) अभ्यागत कक्ष : 42