पंतप्रधान कार्यालय
कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधानांनी वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली
Posted On:
26 JUL 2026 9:48AM by PIB Mumbai
कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या असीम धैर्याला आणि अतुलनीय निष्ठेला कृतज्ञतापूर्वक नमन केले आहे. अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य संपूर्ण देशासाठी कायमच अभिमानास्पद राहील, सैनिकांची ही देशभक्ती आणि समर्पणाची भावना येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
'X' वरील पोस्ट मध्ये पंतप्रधान लिहितात,
"कारगिल विजय दिनानिमित्त, भारताच्या सुरक्षेसाठी असीम धैर्य आणि कटिबद्धता दाखवणाऱ्या आपल्या वीर जवानांप्रती संपूर्ण देश कृतज्ञता व्यक्त करत आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी गाजवलेले शौर्य देशासाठी सदैव अभिमानाची गोष्ट राहील. त्यांची देशसेवा आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा येणाऱ्या प्रत्येक पिढीला अशीच प्रेरणा देत राहील."
***
शिल्पा पोफळे/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2289552)
अभ्यागत कक्ष : 61
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam