पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी हितकारक विचार, वाणी आणि कृतीला प्रोत्साहन देण्याचे महत्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले

Posted On: 24 JUL 2026 7:50AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले, यात विचार, वाणी आणि कृती यांच्या सातत्यपूर्ण सरावामुळे एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य आणि जीवनाची दिशा कशी प्रभावित होते, यावर भर दिला आहे.

पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:

"कर्मणा मनसा वाचा यदभीक्ष्णं निषेवते।

तदेवापहरत्येनं तस्मात् कल्याणमाचरेत्॥"

एखादी व्यक्ती आपली कृती, विचार आणि वाणीद्वारे ज्या गोष्टींचा सतत सराव करते, त्या गोष्टीच तिचे व्यक्तिमत्व घडवतात, आणि तिला त्याच दिशेने पुढे घेऊन जातात; म्हणूनच, आपल्या विचारांमध्ये आणि संभाषणात केवळ हितकारक गोष्टींनाच स्थान दिले पाहिजे. 

***

आशिष सांगळे / राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2288738) अभ्यागत कक्ष : 56