संरक्षण मंत्रालय
डीआरडीओद्वारे 'कुश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी
Posted On:
23 JUL 2026 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2026
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (डीआरडीओ) 23 जुलै 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळच्या ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावर घेण्यात आलेली 'कुश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. या पहिल्या चाचणीत हवेतील अधिक उंचीवरील आणि अति-वेगवान इलेक्ट्रॉनिक लक्ष्याचा या क्षेपणास्त्र प्रणालीने अचूक वेध घेऊन ते निष्प्रभ केल्याने ही चाचणी यशस्वी ठरली.
'कुश' ही क्षेपणास्त्र प्रणाली दीर्घ पल्ल्याच्या आणि उंचीच्या कक्षेतील लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) तसेच शत्रूच्या मोठ्या विमानांसारख्या अनेकविध प्रकारचे हवाई धोके निकामी करण्यास सक्षम आहे. क्षेपणास्त्रे, रडार आणि कमांड अँड कंट्रोल सेंटरसह या प्रणालीचे सर्व घटक डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळा आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांनी विकसित केले आहेत.

'कुश'ची यशस्वीरीत्या घेण्यात आलेली ही चाचणी भारताच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित संशोधन आणि विकास कार्यातील उल्लेखनीय टप्पा असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले; यामुळे काही मोजक्याच देशांकडे असलेल्या, लांब पल्ल्याची 'जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली' विकसित करण्याच्या देशाच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे यांसारख्या प्रणालींसाठी इतर देशांकडून होणाऱ्या आयातीवरील अवलंबित्व संपुष्टात येणार असल्याने देशाच्या हवाई संरक्षण क्षमतेच्यादृष्टीने ही मोठी झेप ठरली आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
संरक्षण सचिव, संरक्षण संशोधन आणि विकास (आर अँड डी) विभागाचे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष श्री राजेश कुमार सिंग यांच्या देखरेखीखाली ही सर्व चाचणी प्रक्रिया पार पडली, ती यशस्वी झाल्याबद्दल उड्डाण-चाचणीत सहभागी असलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
* * *
सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2288639)
अभ्यागत कक्ष : 85