लोकसभा सचिवालय
लोकसभा सभापतींनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला वाहिली पुष्पांजली
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2026 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2026
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त 'संविधान सदन'च्या मध्यवर्ती सभागृहातील त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी संसद सदस्य; माजी सदस्यांसह अन्य मान्यवरांनीही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह यांनीही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना आदरांजली वाहिली.
'लोकमान्य' म्हणून प्रसिद्ध असलेले बाळ गंगाधर टिळक हे एक महान राष्ट्रभक्त, दूरदर्शी नेते, समाजसुधारक आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्व होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जनमानसात राजकीय जाणीव जागृत करण्यात त्यांची अग्रगण्य भूमिका होती तसेच ते 'स्वराज्य' या संकल्पनेचे खंदे पुरस्कर्ते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या ओजस्वी गर्जनेने वसाहतवादी राजवटीविरुद्ध आवाज उठवण्यास अनेक भारतीय पिढ्यांना प्रेरित केले.
देशासाठी त्यांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानाच्या गौरवार्थ, 28 जुलै 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 'संविधान सदन'च्या (तत्कालीन संसद भवन) मध्यवर्ती सभागृहामध्ये लोकमान्य टिळक यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले होते.
* * *
सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288606)
आगंतुक पटल : 15